निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी!
निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी!

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गेले दहा दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर ठाणे शहरातील विविध तलाव, विसर्जन घाटांवर सहा हजार लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शुक्रवारी गणेश विसर्जन मिरवणुकांना सायंकाळी सुरुवात होताच मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह वरुणराजाने हजेरी लावली होती. भरपावसातही ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका सुरूच होत्या. त्यामुळे गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला असल्याचे दिसून आले.

दीड दिवस, पाच दिवस, गौरीगणपती विसर्जन, सात दिवस आणि दहा दिवसाच्या सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी पर्यायी गणेश विसर्जनाची व्यवस्था ठाणे पालिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. या व्यवस्थेंतर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड्स, टिकुजीनी वाडी-बाळकुम रेवाळे, खारेगाव आदी ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करून दिली होती. पारसिक रेतीबंदर विसर्जन महाघाट आणि कोलशेत महाघाट याबरोबरच मिठबंदर, कळवा, गायमुख येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली होती. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर ही गणेशमूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ठाणे महापलिकेने निर्माण केलेल्या या पर्यायी व्यवस्थेचा लाभ उठवित शहरामधील हजारो भाविकांनी गणरायाला भक्तीमय वातावरणात विधिवत निरोप दिला.
--------------------
सर्वाधिक गणेश विसर्जन हे मुंब्रा अग्निशमन केंद्राच्या हद्दीत
ठाणे महापालिका हद्दीतील सहा अग्निशमन केंद्राच्या हद्दीत तयार केलेल्या विसर्जन घाटांवर पाच हजार ५२७ घरगुती, ४५१ सार्वजनिक मंडळातील बाप्पांना निरोप देण्यात आला. यामध्ये सर्वाधिक गणेश विसर्जन हे मुंब्रा अग्निशमन केंद्राच्या हद्दीत एक हजार ८७२ झाले असून, त्याखालोखाल बालकूम अग्निशमन केंद्राच्या हद्दीत एक हजार २५५, वागळे अग्निशमन केंद्राच्या हद्दीत ९७२, पाचपाखाडी केंद्राच्या हद्दीत ९६१ त्यानंतर जवाहर बाग केंद्राच्या हद्दीत ७३३ आणि कोपरी अग्‍निशमन केंद्राच्या हद्दीत १३९ बाप्पांचे विसर्जन करण्यात आले असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96269 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..