गोरेगाव शवविच्छेदन केंद्र सुरु न केल्यास आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोरेगाव शवविच्छेदन केंद्र सुरु न केल्यास आंदोलन
गोरेगाव शवविच्छेदन केंद्र सुरु न केल्यास आंदोलन

गोरेगाव शवविच्छेदन केंद्र सुरु न केल्यास आंदोलन

sakal_logo
By

गोरेगाव शवविच्छेदन केंद्र सुरू न केल्यास आंदोलन
शिवसेनेचा प्रशासनाला इशारा

मुंबई, ता. १० ः गोरेगावच्या (पश्चिम) सिद्धार्थ रुग्णालयाच्या आवारातील बंद अवस्थेत असलेले शवविच्छेदन केंद्र पुन्हा सुरू न केल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा विधानसभा संघटक दिलीप शिंदे यांनी दिला आहे.
हे केंद्र गणेशोत्सवादरम्यान अचानक बंद करण्यात आले. या शवविच्छेदन केंद्रामध्ये गोरेगाव, मालाड, बांगुर नगर, आरे-वनराई, दिंडोशीमधील मृतदेह शवविच्छेदनासाठी आणले जात असत; परंतु अचानक हे केंद्र बंद केल्यामुळे त्या विभागातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मृतदेह तेथपर्यंत आणून ते परत घेऊन जाताना संबंधित नातेवाईकांचे खूप हाल होतात, अशा तक्रारी शिवसेनेकडे करण्यात आल्या. याप्रकरणी माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक आणि विधानसभा संघटक राजू पाध्ये यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96273 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..