साजशृगांराचा आर्टिफिशियल साज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साजशृगांराचा आर्टिफिशियल साज
साजशृगांराचा आर्टिफिशियल साज

साजशृगांराचा आर्टिफिशियल साज

sakal_logo
By

कोमल गायकर ः घणसोली
दोन वर्षे कोरोनामुळे सर्वच सणांवर निर्बंध आले होते. त्यामुळे सणांच्या उत्साहावर विरजण पडले होते. आता निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर महिलावर्गाला नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. त्यामुळे सणासुदींच्या काळात साज शृंगारासाठी सुंदर फुलांच्या वेण्या, गजरे परिधान करण्याकडे महिलावर्गाचा कल आहे. त्यासाठीचे विविध पर्यायदेखील आत्तापासून बाजारात येत असून खऱ्याखुऱ्या फुलांपेक्षा आर्टिफिशिअल गजरा व फुलांना अधिक पसंती मिळत आहे.
---------------------------------------------
महिलांना सजण्यासाठी अनेक गोष्टींची गरज पडते. यात महिला नवनवीन गोष्टी वापरून पाहतात. सणासुदीमध्ये महिलांना सजण्यासाठी केसांच्या विविध हेअर स्टाईल करायला आवडतात. अशातच केसांचे हेअर स्टाईल त्याचबरोबर विविध फुलांच्या डिझाईनदेखील महिलांना करायला आवडतात. ज्याप्रमाणे सर्वच गोष्टी रेडिमेड मिळू लागल्या आहेत, त्याचप्रमाणे मनाला मोहून टाकणारा सुगंध देणारा गजरा आणि वेणीदेखील आता रेडिमेड मिळत आहे. महिलांचे सौंदर्य वाढवण्यासाठी केसांमध्ये माळलेला गजरा व वेणी त्यांचे सौंदर्य वाढवते. आता महिलांना काही वेळातच सुकणारा गजरा न आवडता अगदी दीर्घकाळ टिकणारा आर्टिफिशियल फुलांचा गजरा व वेणी आणू लागली आहेत. यामुळे आता गणपती उत्सव असो किंवा नवरात्री व कोणते कार्यक्रम, असो महिला खऱ्याखुऱ्या मुलांचा गजरा व वेणी वापरण्यापेक्षा आर्टिफिशियल वेण्यांना व गजरांना जास्त प्रमाणात पसंती देत आहे. यामध्ये विविध प्रकारच्या चाफा, गुलाब मोगरा, मोगरांच्या कळ्या अशा विविध पर्यायांसोबत परवडण्याजोगे असल्यामुळे महिलांची पसंती मिळत आहे.
---------------------------------
विविध प्रकारांमध्ये उपलब्ध
आर्टिफिशियल गजरे आणि वेण्या दीर्घकाळपर्यंत टिकतात. तसेच विविध प्रकारांमध्ये उपलब्ध असल्यामुळे केसांनादेखील वेगळ्या प्रकारची शोभा येते, यामुळे महिला सुंदर दिसण्यासाठी वापर करू लागले आहेत. यात लाल फुलाची वेणी पांढऱ्या आणि तांबड्या फुलांची वेणीला महिलांची अधिक पसंती आहे. एवढेच नव्हे, तर लग्नकार्यात अथवा घरात कोणते शुभकार्य जरी असेल, तरीही महिला या आर्टिफिशियल वेण्या वापरू लागल्या आहेत.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
सध्या बाजारात आर्टिफिशल गजरा आणि वेणीचे नवनवीन प्रकार आले असून या फुलांना जास्त प्रमाणात पसंती मिळत आहे.
- वृषाली कांबळे, महिला

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96283 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..