बाप्पाला निरोप देताना भक्त भावूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाप्पाला निरोप देताना भक्त भावूक
बाप्पाला निरोप देताना भक्त भावूक

बाप्पाला निरोप देताना भक्त भावूक

sakal_logo
By

पालघर, ता. १० (बातमीदार) : विघ्नहर्त्याला शुक्रवारी श्रद्धेने निरोप देण्यात आला. दुपारी चार वाजल्यापासून घरगुती व सार्वजनिक गणपतीच्या मिरवणुकीस सुरुवात झाली होती. भाविकांनी भक्तिमय वातावरणात बाप्पाचे विसर्जन केले. कोरोना विषाणूच्या संक्रमणानंतर यावर्षी निर्बंधमुक्त वातावरणात बाप्पाचा उत्सव साजरा झाला. ‘गणपती बाप्पा मोरया... पुढल्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात बाप्पाला आबालवृद्धांनी व भाविकांनी श्रद्धेने निरोप दिला. या वर्षी ३३८ सार्वजनिक व ९८४ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
पालघर शहरात गणेश विसर्जसाठी संध्याकाळी सातनंतर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रस्त्याच्या दुतर्फा बाप्पाला निरोप देण्यासाठी उभा होता. पालघरमध्ये काँग्रेस, शिवसेना, मनसे, बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, बजरंग दल व पालघर नगर परिषदेने आपले मंच स्थापून विसर्जनासाठी जाणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी अनिरुद्ध उपासना ट्रस्टचे स्वयंसेवक दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाहतूक व्यवस्था हाताळत होते. काही स्वयंसेवी संस्थांनी यावेळेस अल्पपोहाराची व पाण्याची व्यवस्था जागोजागी केली होती. बाप्पाला निरोप देण्यासाठी पालघरचे खासदार राजेंद्र गावित, बोईसरचे आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढण, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, तहसीलदार सुनील शिंदे, नगराध्यक्ष उज्ज्वला काळे, पी. टी. पाटील, प्रभाकर पाटील, नागेश पाटील, गटनेते कैलास म्हात्रे व नगरसेवक मंडळी यावेळी उपस्थित होते. यावेळी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याकरिता पालघर पोलिसांकडून एक पोलिस अधीक्षक, एक अपर पोलिस अधीक्षक, चार उपविभागीय पोलिस अधिकारी, ८१ पोलिस अधिकारी, ५९१ पोलिस अंमलदार, ४०० होमगार्ड, चार स्ट्रायकिंग फोर्स, दोन दंगल नियंत्रण पथक व दोन राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या यावेळी तैनात करण्यात आल्या होत्या.

असे झाले विसर्जन
पोलिस ठाणे- सार्वजनिक - खासगी
पालघर - ३७ - ७२
मनोर - ९ - २५
सफाळे - ५ - ०,
सातपाटी - २८ - ३१
बोईसर - १७ - ४३०
तारापूर - २ - २५
वाणगाव - १२ - ०
घोलवड - ६ - ४
जव्हार - ४० - ५८
कासा - १० - २०
विक्रमगड - १७ - ६
वाडा - ३९ - ३५
मोखाडा - १०२ - २७६

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96285 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..