कागदपत्राच्या पूर्ततेसाठी इच्छुकांची लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागदपत्राच्या पूर्ततेसाठी इच्छुकांची लगबग
कागदपत्राच्या पूर्ततेसाठी इच्छुकांची लगबग

कागदपत्राच्या पूर्ततेसाठी इच्छुकांची लगबग

sakal_logo
By

डहाणू, ता. १० (बातमीदार) : तालुक्यातील अनुसूचित आणि पेसा अंतर्गत असणाऱ्या ६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १३ ऑक्टोबरला होणार आहेत. या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची विविध कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी लगबग सुरू झाली आहे.
निवडणूक आयोगाने बुधवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतात इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. निवडणुका जाहीर होताच बैठकांचा सिलसिला सुरू झाला असून निवडणुकांच्या कामासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे सुरू झाले आहेत. डहाणू तालुका हा पूर्णपणे अनुसूचित क्षेत्रात आणि पेसा अंतर्गत असल्याने त्या ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी शंभर टक्के आरक्षण लागू राहणार आहे. त्यामुळे काही ग्रामपंचायत हद्दीत ओबीसी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असली तरी, त्यांना आरक्षण मिळणार नसल्याने नाराजी पसरली आहे. शिवाय या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी थेट निवडणुका होणार असल्या तरी सर्वच ग्रामपंचायतींवर अनुसूचित जमातीचे सरपंच विराजमान होणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96291 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..