आंबोली येथे कंटेनरला टेम्पोची धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबोली येथे कंटेनरला टेम्पोची धडक
आंबोली येथे कंटेनरला टेम्पोची धडक

आंबोली येथे कंटेनरला टेम्पोची धडक

sakal_logo
By

कासा, ता. १० (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गांवर मुंबईहून सुरतकडे जाणाऱ्या टेम्पोने कंटेनरला धडक दिल्याने टेम्पोच्या क्लिनरचा चिरडून जागीच मृत्यू झाला. टेम्पो मुंबईहून गुजरातकडे जात असताना गुरुवारी पहाटे ५.३० च्या सुमारास चारोटी ते आंबोलीदरम्यान महामार्गांवर ना-दुरुस्त कंटेनर उभा होता. या कंटेनरला टेम्पोने जोरदार धडक दिली. या धडकेत टेम्पोच्या क्लिनर हिगोरा मोहमद हा चिरडला गेला; तर चालकाला किरकोळ दुखापत झाली. महामार्ग पोलिसांनी इतर वाहनचालकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना कासा उप-जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी क्लिनरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात आंबोली गावाच्या हद्दीत तुळशी हॉटेलजवळ घडला. एक कंटेनर ना-दुरुस्त असल्याने तिसऱ्या लेनवर उभा केला होता. कंटेनरचालकाने निष्काळजीपणे तेथे कोणत्याही सिग्नल, चिन्ह, निशाण्या ठेवल्या नव्हत्या. कासा पोलिसांनी कंटेनरचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96293 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..