वसंत पाटील यांना कुस्तीभूषण पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसंत पाटील यांना कुस्तीभूषण पुरस्कार
वसंत पाटील यांना कुस्तीभूषण पुरस्कार

वसंत पाटील यांना कुस्तीभूषण पुरस्कार

sakal_logo
By

भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : भाईंदर येथील गणेश कुस्ती आखाड्याचे मार्गदर्शक वसंत पाटील यांनी कुस्ती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना या वर्षीचा ‘क्रांतिवीर शामराव (बापू) लाड कुस्ती भूषण पुरस्कार २०२२’ घोषित झाला आहे. सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार कुस्ती मैदानात देण्यात येणार आहे.
वसंत पाटील गेली अनेक वर्षे कुस्ती प्रशिक्षक व संस्कार शिबिरे घेऊन नवोदित मल्ल घडविण्याचे काम करीत आहेत. त्यांनी अनेक गोरगरीब होतकरू मल्लांना दत्तक घेतले आहे. तसेच मुंबईत महाराष्ट्र केसरी, कामगार केसरी, महापौर केसरीसह अनेक कुस्ती स्पर्धा पार पाडल्या आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. यापूर्वी हा पुरस्कार रूस्तम-ए-हिंद पै. हरिश्चंद्र बिराजदार, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त कुस्ती प्रशिक्षक पै. नजरूद्दीन नायकवडी, आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक पै. उत्तमराव पाटील यांना मिळाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96295 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..