पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला
पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला

पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता.१० : गुरुवारी सायंकाळी कळव्‍यात अतिवृष्टीमुळे डोंगरावरून आलेला पाण्याचा मोठा प्रवाह भास्कर नगर येथील मारुती चाळीत घुसला. या प्रवाहाच्या पाण्यात अभी सिंह मौर्या हा (वय ४) वर्षीय चिमुरडा वाहून गेला होता. त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी राहत्या घरापासून ५०० मीटर अंतरावरील मफतलाल कंपनीजवळील नाल्यात सापडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
गुरुवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे कळवा भास्कर नगर येथील डोंगरावरील पाण्याचा मोठा प्रवाह डोंगराजवळील चाळीत शिरला. याचदरम्यान अभी सिंह मौर्या हा चिमुरडा पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन पथक, कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त व कळवा पोलिसांनी धाव घेतली. या पथकाने घटनास्थळ भास्कर नगरमधून मफतलाल कंपाऊंडकडे जाणाऱ्या नाल्यात सुमारे तीन तास शोधकार्य केले, मात्र रात्रीच्या अंधारात अडचणी आल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता पुन्हा शोधकार्याला सुरू झाली. त्यानंतर अवघ्या ३० ते ४० मिनिटांतच चिमुरड्याचा मृतदेह मफतलाल कंपनीजवळील नाल्यात सापडला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96301 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..