गिरगाव चौपाटी व जुहू चौपाटी येथे स्वच्छता मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गिरगाव चौपाटी व जुहू चौपाटी येथे स्वच्छता मोहीम
गिरगाव चौपाटी व जुहू चौपाटी येथे स्वच्छता मोहीम

गिरगाव चौपाटी व जुहू चौपाटी येथे स्वच्छता मोहीम

sakal_logo
By

गिरगाव चौपाटी व जुहू चौपाटी येथे स्वच्छता मोहीम
क्रीडामंत्री गिरीश महाजन यांचाही सहभाग

मुंबादेवी, ता. १० (बातमीदार): शुक्रवारी (ता. ९) अनंत चतुर्दशीनिमित्त दिवसभर मुंबईतील गणरायाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. मुंबईतील दादर, गिरगाव, जुहू चौपाट्या, तसेच तलाव, कुंड आणि कृत्रिम तलावांत आपल्या बाप्पाला निरोप देण्यात आला. शनिवारी (ता. १०) सकाळी गिरगाव चौपाटी येथे महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
याकरिता मध्य मुंबई जिल्हा संस्था, दादर; पूर्व मुंबई उपनगर जिल्हा संस्था, चेंबूर; पूर्व मुंबई व पश्चिम मुंबई जिल्हा संस्था आझाद मैदान, मुंबई येथील विविध शाळांतील स्काऊट गाईड, रोव्हर रेंजर युनिट लीडर, राज्य कार्यालयांतील कर्मचारी-अधिकारी व इतर असे मिळून एकूण ४०० सभासद तसेच एनसीसीमधील १५०० मुले-मुली आणि अधिकारी असे एकूण १९०० सभासद या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर जुहू चौपाटी येथेही ३०० विद्यार्थी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
एनसीसी व स्काऊट गाईड विद्यार्थी यांनी संयुक्तरीत्या स्वच्छता मोहीम राबवित गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जनानंतर जमा होणारे निर्माल्य व इतर कचरा गोळा करून पालिकेच्या वाहनातून चौपाटी येथून हटविण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य संस्थेचे एन. बी. मोटे- राज्य चिटणीस, तसेच अनेक मान्यवर या स्वच्छता मोहिमेत उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गिरीश महाजन म्हणाले, ‘‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई ही संकल्पना पुढे ठेवून स्वच्छता मोहीम राबविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ज्या भावनेने आपण गणेशाचे पूजन केले, त्याच भावनेने आपण स्वच्छताही केली पाहिजे.’’ स्काउट गाईड यांनी गिरगाव चौपाटी येथे स्वच्छता अभियान राबविले. त्याबद्दल महाजन यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96302 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..