मुलुंडमध्ये १६ पासून पितृस्मृती व्याख्यानमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये १६ पासून पितृस्मृती व्याख्यानमाला
मुलुंडमध्ये १६ पासून पितृस्मृती व्याख्यानमाला

मुलुंडमध्ये १६ पासून पितृस्मृती व्याख्यानमाला

sakal_logo
By

मुलुंडमध्ये १६ पासून पितृस्मृती व्याख्यानमाला

मुलुंड, ता. १० (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघ संचालित साहित्यसम्राट न. चि. केळकर ग्रथालय यांच्यातर्फे कै. लक्ष्मणराव महाबळ पितृस्मृती व्याख्यानमालेचे आयोजन १६ सप्टेंबरपासून करण्यात आले आहे. रणधुरंधर सरदार बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर अशा या शूरवीरांच्या स्मरणार्थ आणि त्यांना वंदन करण्यासाठी पितृस्मृती व्याख्यानमालेचे आयोजन शुक्रवार, १६ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर २०२२ या कालावधीदरम्यान सेवा संघाच्या सुविधा शंकर गोखले सभागृहामध्ये संध्याकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध इतिहास संशोधक कौस्तुभ कस्तुरे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रम मोफत असून सर्व नागरिकांनी त्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96303 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..