महिला आयोग आपल्या दारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला आयोग आपल्या दारी
महिला आयोग आपल्या दारी

महिला आयोग आपल्या दारी

sakal_logo
By

‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत १६ रोजी जनसुनावणी

पनवेल, ता. ११ (बातमादार) : ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. १६) अलिबाग येथे जनसुनावणी होणार आहे. यासाठी कोणतीही पीडित महिला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकणार आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य होत नाही. महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरिता ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत १६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रारदार पीडित महिलेस स्थानिक पातळीवर तत्काळ मदत व्हावी, यासाठी रायगड जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या महिला समुपदेशन, सहाय्य कक्ष, भरोसा सेल तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या विभागीय कार्यालयातील रायगड जिल्ह्यांच्या तक्रारी व इतर सेवाभावी संस्थेचे समुपदेशन केंद्र यांच्याकडील प्रकरणे या जनसुनावणीत ठेवण्याच्या सूचना आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.
कोणतीही पीडित महिला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकेल. ज्या महिलांचे प्रकरण न्यायालयात सुरू असेल अथवा न्यायप्रविष्ट असेल, अशी प्रकरणे या जनसुनावणीत स्वीकारली जाणार नाहीत.
देशातील महिला आणि बालकांच्या पोषणाची स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने सन २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पोषण अभियान’ सुरू केले होते. पोषण अभियानात बालके, किशोरवयीन, गरोदर महिला आणि स्तनदा माता यांच्यामध्ये पोषणविषयक जागरूकता आणि प्रतिसाद वाढविण्याच्या अनुषंगाने २०१८ पासून सप्टेंबर महिन्यात सर्व भागधारकांसोबत एकत्रितपणे राष्ट्रीय पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने जनसुनावणीच्या दिवशी सकाळी १० ते ११ या वेळात पोषण पंचायतअंतर्गत चर्चासत्र आयोजित करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.
राज्य महिला आयोगामार्फत आयोजित या जनसुनावणीकरिता सकाळी ११ ते २ या वेळेत जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी क्षेत्रातील समस्याग्रस्त महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, तसेच अधिक माहितीसाठी परिविक्षा अधिकारी योगीराज जाधव (७७९८१७१७७७ / ९९७०१२२६२३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96314 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..