बीएसफोर वाहनांच्या नोंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीएसफोर वाहनांच्या नोंदी
बीएसफोर वाहनांच्या नोंदी

बीएसफोर वाहनांच्या नोंदी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः बुलडाणा, नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांचे युजर पासवर्ड वापरून बीएस फोर वाहनांच्या नोंदी करण्यात आल्याचे प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणात बुलडाणा येथील चार कर्मचारी; तर नंदुरबार येथील दोन कर्मचाऱ्यांचे परिवहन आयुक्तांनी निलंबनसुद्धा केले. मात्र अशा अनेक वाहनांच्या बॅकलाॅग नोंदी प्रत्येक आरटीओ कार्यालयातून झाल्याची शक्यता असल्याने परिवहन आयुक्तांनी प्रत्येकाला चौकशी अहवाल मागितला आहे.
एनआयसीने तयार केलेल्या परिवहन विभागाचे वाहन आणि सारथी संकेतस्थळावर प्रचंड त्रुटी असल्याचे बुलडाणा, नंदुरबार येथील प्रकरणात उघड झाले आहे. बुलडाणा येथून ३४; तर नंदुरबार ८३ बीएसफोर वाहनांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. नंदुरबार प्रकरणात स्थानिक पोलिस विभागाचे सायबर सेल तपास करत असून बुलडाणा येथील स्थानिक पोलिस ठाण्यामार्फत तपास सुरू आहे. ज्यामध्ये नंदुरबार आरटीओ कार्यालयात बेकायदा नोंदी झालेल्या वाहनांपैकी १७ तर बुलडाणा येथील दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.
या प्रकाराची पाळेमुळे राज्यभरात असल्याची धक्कादायक माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली असून, त्यासाठी परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयांमध्ये बीएसफोर वाहनांची बॅकलाॅग नोंदी किंवा टॅक्स क्लियरन्स झाल्याच्या घटनांची माहिती मागितली आहे. ज्यातून बीएसफोर वाहनांच्या नोंदीची धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
...
मुख्य आरोपी फरारी
नंदुरबार येथील सायबर सेलकडून बॅकलाॅग वाहन नोंदीच्या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. औरंगाबाद येथील सलीम खान मुख्य आरोपी असल्याची प्राथमिक माहिती आरटीओ कार्यालयाकडून मिळाली असून खान फरारी असल्याने त्याला अद्याप अटक झाली नसल्याचे सांगण्यात आले. खानला अटक झाल्यानंतर या प्रकणात मोठे खुलासे होण्याची शक्यता परिवहन विभागाने व्यक्त केली आहे.
...

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96328 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..