किनारा स्वच्छतेसाठी बॉलीवूड सेलिब्रिटी सरसावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किनारा स्वच्छतेसाठी बॉलीवूड सेलिब्रिटी सरसावले
किनारा स्वच्छतेसाठी बॉलीवूड सेलिब्रिटी सरसावले

किनारा स्वच्छतेसाठी बॉलीवूड सेलिब्रिटी सरसावले

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : ढोल-ताशांच्या गजरात शुक्रवारी मुंबई आणि उपनगरांत मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. विविध विसर्जन स्थळी बाप्पाला निरोप देण्यात आला. त्यानंतर आज शनिवारी काही ठिकाणी किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जुहू समुद्रकिनारी झालेल्या मोहिमेत बॉलीवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. मालाडमधील आक्सा बीचही पालिकेच्या वतीने स्वच्छ करण्यात आला. त्यातही सेलिब्रिटींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत किनाऱ्याची स्वच्छता केली.

मुंबई महापालिकेच्या सहकार्याने चित्रपटसृष्टीतील काही सेलिब्रिटींच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शनिवारी सकाळीच सेलिब्रिटी स्वच्छतेसाठी समुद्रकिनारी पोहचले. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, अभिनेत्री परिणिती चोप्रा आदींनी जुहू किनारी स्वच्छता केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. सेलिब्रिटींबरोबरच शनिवारी पहाटे हजारो स्वयंसेवक, शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, तरुण, महापालिका कामगार इत्यादींनी स्वच्छतेत आपला खारीचा वाटा उचलला. मोठ्या ट्रकमधून कचरा वाहून नेण्यात आला. जुहू बीच स्वच्छ करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर नागरिकांनीही गर्दी केली होती.
शालेय मुलांचा सहभागही मोठा होता. समुद्रकिनाऱ्याभोवती फिरून टाकाऊ वस्तू उचलून ते गोळा करून ठेवत होते. पालिका कर्मचारी शिस्तबद्ध पद्धतीने डबे उचलून कचरा गोळा करत होते. स्वच्छता मोहीम पार पडताच समुद्रकिनारा पूर्वीप्रमाणेच स्वच्छ दिसू लागल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावर पादत्राणे, बाटल्या, काचेचे तुकडे इत्यादी कचरा गोळा होत असतो. मुंबईत गणेशोत्सवानंतर दरवर्षी स्वच्छता मोहीम राबवली जाते.

स्वच्छतेचा संदेश
आक्सा बीचवर झालेल्या स्वच्छता मोहिमेत अभिनेत्री टिना दत्ता, शिवानी रांगोळे, अभिनेता विराजस कुलकर्णी आदींबरोबर पालिका कर्चचारी आणि काही स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. सर्वांनी मोहिमेदरम्यान स्वच्छतेचा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96332 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..