एक्सल कंपनीत रसायनांचा स्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक्सल कंपनीत रसायनांचा स्फोट
एक्सल कंपनीत रसायनांचा स्फोट

एक्सल कंपनीत रसायनांचा स्फोट

sakal_logo
By

रोहा, ता. ११ (बातमीदार) ः तालुक्यातील धाटाव एमआयडीसीतील एक्सल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत घातक रसायनांचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत ४ कामगार जखमी झाले आहेत. त्यापैकी एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर ऐरोली येथील खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
धाटाव एमआयडीसीतील एक्सल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत शनिवारी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास ही घटना घडली. कंपनीतील कामगार कंटेनरमधील पी २ एस ५ हा घातक रसायने खाली करत होते. यावेळी ड्रमला चिकटलेले घातक रसायन काढण्यासाठी लाकडी हातोड्या लोखंडी साहित्य वापरल्याने रसायनाने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातात रामचंद्र ढमाल हा कामगार गंभीर जखमी झाला असून रोह्यातील डॉ. जाधव नर्सिंग होम येथील प्राथमिक उपचार केल्यानंतर ऐरोली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; तर अन्य ३ कामगार किरकोळ जखमी असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडले आहे.

कोट :
या अपघातात एक कामगार गंभीर जखमी असून त्याच्यावर ऐरोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अन्य कामगारांना घरी सोडण्यात आले आहे. कामगारांच्या सुरक्षेविषयी सर्व खबरदारी कंपनीकडून घेण्यात येत असून या घटनेची अधिक माहिती घेऊन भविष्यात अशा पद्धतीची घटना घडणार नाही, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येईल.
- हशीराम मंचेकर, वरिष्ठ अधिकारी, एक्सल कंपनी धाटाव

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96356 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..