लहान मुलांच्या मदतीने चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लहान मुलांच्या मदतीने चोरी
लहान मुलांच्या मदतीने चोरी

लहान मुलांच्या मदतीने चोरी

sakal_logo
By

खारघर, ता.११ (बातमीदार) : खारघर गावात भीक मागण्याच्या बहाण्याने चोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या महिला आणि तिच्या मुलीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.
खारघर गावात दोन मुलींना सोबत घेऊन भीक मागणाऱ्या महिलेने गावातील विश्वनाथ भगत यांच्या घरातील पहिल्या मजल्यावर मोठ्या मुलीला चोरी करण्यासाठी पाठविले होते. यावेळी भगत हे बाहेर गेले होते; तर त्यांची पत्नी देवघरात पूजा करीत होती. याचवेळी मुलीने घरातील मोबाईल व इतर साहित्य चोरी करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला; पण भगत यांच्या पत्नीला हा प्रकार समजल्याने त्यांनी चोरी करणाऱ्या मुलीला रंगेहाथ पकडल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96358 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..