पदपथावर फेरीवाल्‍यांचे अतिक्रमण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदपथावर फेरीवाल्‍यांचे अतिक्रमण
पदपथावर फेरीवाल्‍यांचे अतिक्रमण

पदपथावर फेरीवाल्‍यांचे अतिक्रमण

sakal_logo
By

चेंबूर, ता. ११ (बातमीदार) ः चेंबूर येथील एनजी आचार्य मार्गावरील पदपथावर अनधिकृत फेरीवाल्‍यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे हे पदपथ मोकळा श्वास कधी घेणार आणि पायी चालणाऱ्यांना केव्हा उपलब्ध होणार, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
चेंबूर येथील एन. जी. आचार्य मार्ग, टेम्बे पूल, घाटला परिसर येथे मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी पदपथांवर आपले बस्‍तान मांडले आहे. यामुळे नागरिकांना येथून चालणे अवघड झाले आहे. याकडे पालिका व पोलिसही दुर्लक्ष करत असल्‍याचा आरोप स्‍थानिकांनी केला आहे.
रेल्वेस्थानकापासून १५० मीटरच्या अंतरापर्यंत कोणत्याही फेरीवाल्यास धंदा लावण्यास मनाई आहे. मात्र असे असूनही फेरीवाले फुटपाथवर संध्याकाळी धंदे लावून फुटपाथ व मार्ग अडवून ठेवत आहेत. रेल्वे स्थानकासमोरच पोलिस बिट चौकी आहे. या चौकीच्या बाजूला व पाठीमागे धंदे लावले जात असल्‍याने नागरिक आश्‍चर्य व्‍यक्‍त करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96363 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..