मोबाईल चोराला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल चोराला अटक
मोबाईल चोराला अटक

मोबाईल चोराला अटक

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ११ (बातमीदार) ः ट्रॉम्बे परिसरातून मोबाईल हिसकावून पळालेल्या मेहबूब शेख ऊर्फ मुज्जू या चोराला ट्रॉम्बे पोलिसांनी मुंब्रा परिसरातून अटक केली आहे. त्याने गुरुवारी (ता. ८) सकाळी एका महिलेच्या हातातून मोबाईल हिसकावून पळ काढला होता. ट्रॉम्बे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद नाणेकर व गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या सहा तासांत त्याच्या मुसक्या आवळत चोरलेला मोबाईल फोन जप्त केला.
गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास ट्रॉम्बेच्या जॉन्सन मार्गावरून तनजीरा खान या कामाच्या ठिकाणी जात होत्या. त्या वेळी मुज्जूने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून त्यांना धक्का देत पळ काढला होता. तनजीरा यांनी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदवली. त्यानुसार नाणेकर यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. मुज्जू ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात असल्याची माहिती खबऱ्यांनी पोलिसांना दिली होती. त्या माहितीच्या आधारे पथक मुंब्रा येथे पोहोचले. मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याला मुंब्य्राच्या कौसा-शिळफाटा येथे गाठून त्याच्या मुसक्या आवळण्यात पथकाला यश आले. त्याच्याकडून चोरलेला मोबाईल फोनदेखील जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96364 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..