कल्याण लोकसभा मतदार संघात मीच उमेदवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण लोकसभा मतदार संघात मीच उमेदवार
कल्याण लोकसभा मतदार संघात मीच उमेदवार

कल्याण लोकसभा मतदार संघात मीच उमेदवार

sakal_logo
By

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ११ : लोकसभा २०२४ च्या निवडणुका जवळ आल्या असून, त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील १६ मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे आयोजित करण्यात आले आहेत. शिवसेनेचा गड आणि शिंदेशाहीचा गड असलेल्‍या कल्याण लोकसभा मतदारसंघातही भाजपने कमळ फुलविण्याचा सूचक इशारा दिला आहे. रविवारी भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी या मतदार संघातील दौऱ्यास सुरुवात केली. दरम्‍यान, कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा असून येथील २०२४ मध्ये युतीचे उमेदवारही मीच असणार, असा ठाम दावा डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्र्यांचे दौरे आयोजित करण्यात आले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी अनुराग ठाकूर हे रविवारी डोंबिवलीत आले होते. भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात मंत्री ठाकूर यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही अनुराग यांचे स्वागत केले. या वेळी केंद्रीय मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, शिंदे गटाचे राजेश मोरे, दिपेश म्हात्रे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी डॉ. शिंदे यांच्या घरी चहापानाच्या कार्यक्रमाचे खास आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेने दिलेला मैत्रीचा मोदक अधिक गोड असल्याची प्रतिक्रिया मंत्री अनुराग यांनी व्यक्त केली.

शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका
भाजपने २०२४ मध्‍ये कल्याण लोकसभा मतदारसंघावर कमळ फुलविण्याचा दावा केला. याबाबत बोलताना खासदार शिंदे म्हणाले, भाजपच्या वतीने सहा महिन्यांपूर्वीच हा दौरा आयोजित करण्यात आला होता. प्रत्येक पक्षाला आपले संघटन मजबूत करायचा अधिकार असून त्यानुसार त्यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. गेल्या वेळी अमित शहा मुंबईत आले होते, तेव्हा त्यांनी स्पष्ट केले होते की, यापुढे ज्या काही निवडणुका होतील त्या भाजप-शिवसेना युतीच्या होणार असून, शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होतील. पक्षातील वरिष्ठांनीच हे सूचित केले असल्याने कल्याण लोकसभेवर भाजपने दावा करण्याचा प्रश्न येत नाही. कल्याण लोकसभा हा शिवसेनेचा मतदारसंघ असून २०२४ मध्येही येथील मीच युतीचा उमेदवार असणार, यात कोणतीही शंका नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96373 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..