स्वातंत्र्यसैनिक कावेरी पाटील यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्यसैनिक कावेरी पाटील यांना अभिवादन
स्वातंत्र्यसैनिक कावेरी पाटील यांना अभिवादन

स्वातंत्र्यसैनिक कावेरी पाटील यांना अभिवादन

sakal_logo
By

कळवा, ता. ११ (बातमीदार) : कळवा व बदलापूरच्या ग्रामीण भागात शिक्षण संस्थांचे जाळे विणणाऱ्या शिक्षण महर्षी, स्वातंत्र्यसैनिक कावेरी पाटील यांचा आठवा स्मृतिदिन नुकताच कळव्यातील न्यू कळवा हायस्कूलच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. भारतावर ब्रिटिशांची सत्ता असताना कळव्यातील एका १६ वर्षांच्या विवाहित व गरोदर महिलेने आपल्या पतीसोबत ठाण्याच्या तहसील कार्यालयावरील ब्रिटिश युनियन जॅक उतरवल्याप्रकरणी त्यांना एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यांनी कळवा ग्रामपंचायतीच्या सरपंच ते ठाणे महापालिकेच्या नगरसेविका असा राजकीय प्रवास केला होता. या कार्यक्रमावेळी त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. या वेळी गोपाळराव पाटील शिक्षण संस्थेचे खजिनदार किशोर भोईर, न्यू कळवा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मनोहर म्हात्रे, उपप्राचार्य विलास भोंडिवले, मुख्याध्यापिका रंजना स्वामी, चित्रा परब आदी मान्यवर उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96375 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..