उल्हासनगरात पूर्वेतील युवासेनेला खिंडार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात पूर्वेतील युवासेनेला खिंडार
उल्हासनगरात पूर्वेतील युवासेनेला खिंडार

उल्हासनगरात पूर्वेतील युवासेनेला खिंडार

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) : शिवसेनेच्या काही माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर आता उल्हासनगर पूर्वेतील युवासेनेलादेखील खिंडार पडले आहे. पूर्वेचे युवासेना अधिकारी, हॉटेल व्यावसायिक सुशील पवार यांनी त्यांच्या टीमसोबत शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर सुशील पवार यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगरसेवक अरुण आशान, कलवंतसिंग (बिट्टू) सोहता, युवासेना कल्याणचे उपसचिव युवराज पाटील आदी उपस्थित होते. सुशील पवार यांच्यासोबत युवासेनेचे विभागप्रमुख शेखर सपकाळे, रवी वलेचा, सिद्धांत चव्हाण, उपशाखाप्रमुख सचिन भोजने, शाखा अधिकारी ऋषिकेश गीते, आदित्य पाटील, युवा सेना पदाधिकारी सुमित अहिरे, शैलेश बोराडे, धीरज खरे, रवी जाधव, इस्माईल शेख, नीलेश मोरे या टीमनेही शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96376 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..