बोळींज केंद्राचा शिक्षक दिन उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोळींज केंद्राचा शिक्षक दिन उत्साहात साजरा
बोळींज केंद्राचा शिक्षक दिन उत्साहात साजरा

बोळींज केंद्राचा शिक्षक दिन उत्साहात साजरा

sakal_logo
By

विरार, ता. ११ (बातमीदार) : विरार पश्चिमेकडील बोळींज केंद्राचा शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रप्रमुख स्नेहा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जाई वेल, राजोडी या ठिकाणी सांस्कृतिक समितीने कार्यक्रमांचे नियोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. शिक्षिकांनी ईशस्तवन, स्वागतगीत सादर केले. यावेळी केंद्रप्रमुखांनी गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन शिक्षकांचा गौरव केला. स्नेहा गोरे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शैक्षणिक कार्य व शिक्षक दिन का साजरा करतो, याचे महत्त्व सांगितले. सावित्री फुले स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या त्यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. शैला पाटील, डेनिस मच्याडो, सुवर्णा भगत, दीपा वडे, सोफिया राँड्रिग्ज, मृणाल पाटील, संगीता जाधव, संगीता राऊत, गणेश योगे व मंजूषा गवई यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96383 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..