जनसंवाद यात्रेत तारपा नृत्य स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनसंवाद यात्रेत तारपा नृत्य स्पर्धा
जनसंवाद यात्रेत तारपा नृत्य स्पर्धा

जनसंवाद यात्रेत तारपा नृत्य स्पर्धा

sakal_logo
By

कासा, ता. ११ (बातमीदार) : पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जनसंवाद अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून कासा पोलिस ठाणे हद्दीत जिल्हास्तरीय पारंपरिक तारपा नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक दहा हजार रुपये, द्वितीय बक्षीस सात हजार, तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा आचार्य भिसे विद्यालयाच्या पटांगणात शुक्रवारी (ता. १६) दुपारी चार वाजता होणार आहे. या वेळी पालघर जिल्हा अधीक्षक पोलिस बाळासाहेब पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उप विभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेसी, कासा पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96385 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..