जागतिक विक्रमात वसईचा बोलबाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक विक्रमात वसईचा बोलबाला
जागतिक विक्रमात वसईचा बोलबाला

जागतिक विक्रमात वसईचा बोलबाला

sakal_logo
By

वसई, ता. ११ (बातमीदार) : वसईत ‘एक झलक विविधता मे एकता’ स्पर्धेत ८१ लोकनृत्य व शास्त्रीय नृत्य सादर करण्यात आली. यात उर्वशी कथ्थकच्या मुलींनी बाजी मारली असून याची लंडनच्या जागतिक विक्रम नोंद झाली झाली आहे. सुशील निर्मल फाऊंडेशनच्या डॉ. मीना श्रीवास्तव यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
महाराष्ट्रातील अनेक संस्था आणि समूहांद्वारे २०१ जणांनी ८१ लोकनृत्य व शास्त्रीय नृत्य सादर करून आपली कला सादर केली. यात उर्वशी कथ्थक प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका दीपा घोडगावकर व त्यांचे विद्यार्थी राघव सुंदरम, भार्गवी गोंधळी, वरुषा मंडलोई यांनी सहभाग घेतला होता. जुलै महिन्यात ही स्पर्धा पार पडली.
दीपा घोडगावकर यांना लहानपणापासून कथ्थकची आवड होती. गेल्या २७ वर्षांपासून त्या मुलींना कथ्थक शिकवत आहेत. घोडगावकर यांनी त्यांच्या इंदोरच्या गुरू जयश्रीताई तांबे यांच्याकडून धडे गिरवले. आपली कला पुढे यावी यासाठी त्यांचा प्रवास सुरू झाला आणि थेट जागतिक विक्रमापर्यंत पोहचला आहे. अनेक मुलींनी स्पर्धेत सहभाग घेऊन नाव उज्ज्वल केले आहे. जयपूर, लखनौ, बनारस या तिन्ही घराण्याचे कथ्थक त्या शिकवत आहेत. पंडित बिरजू महाराज यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. सध्या त्यांच्याकडे ३० विद्यार्थिनी आहेत. ज्यावेळी डॉ. मीना श्रीवास्तव यांची सोबत त्यांना मिळाली, त्यावेळी त्यांनी या उपक्रमात सहभाग घेत यश प्राप्त केले आहे. लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य व कला आदी विषयांवर या कार्यकमात नृत्य करण्यात आले. यात यु. के. वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटमध्ये याची नोंद करण्यात आली आहे. यात सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
---------------------------
कथ्थक नृत्य शरीर लवचिक ठेवते, व्यायामदेखील होतो. शिकण्यास उशीर लागतो, मात्र अन्य नृत्य प्रकार शिकताना अडचणी येत नाहीत, तर सोपे होते. जागतिक विक्रमाची नोंद झाली, ही आनंदाची बाब आहे. अधिकाधिक मुलींनी कथ्थककडे वळावे. आपली कला पुढे आणली पाहिजे.
- दीपा घोडगावकर, संचालिका, उर्वशी कथ्थक प्रशिक्षण केंद्र

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96392 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..