मुरबाड येथे हुतात्म्यांना आदरांजली व रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरबाड येथे हुतात्म्यांना आदरांजली व रक्तदान शिबिर
मुरबाड येथे हुतात्म्यांना आदरांजली व रक्तदान शिबिर

मुरबाड येथे हुतात्म्यांना आदरांजली व रक्तदान शिबिर

sakal_logo
By

मुरबाड, ता. ११ (बातमीदार) : राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाच्या निमित्ताने मुरबाड येथील वन विभागाच्या कै. अविनाश बोंबे सभागृहात रविवारी वन हुतात्म्यांना आदरांजली देण्‍याचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी वन हुतात्म्यांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात वन्य जीव विभागाचे अप्पर प्रधान, मुख्य वन संरक्षक डॉ. क्लेमेंट बेन, तसेच वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गिरिजा देसाई उप वन संरक्षक, वन विभाग ठाणे, भाग्यश्री पोले, सहाय्यक वन संरक्षक ठाणे, सेवानिवृत्त वन संरक्षक किशोर ठाकरे, वनाधिकारी अजय पिल्लारी, चंद्रकांत शेळके उपस्थित होते. त्यांच्‍या हस्ते वीरपत्नी भरती देसले व वाजंत्री कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96394 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..