जमीन खचल्याने घराचा भाग कोसळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमीन खचल्याने घराचा भाग कोसळला
जमीन खचल्याने घराचा भाग कोसळला

जमीन खचल्याने घराचा भाग कोसळला

sakal_logo
By

कळवा, ता. ११ (बातमीदार) : मुंब्र्यातील रेतीबंदर परिसरातील जमीन खचल्याने घराचा मागील भाग कोसळल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन घरात राहणाऱ्या सहा जणांना शेजारच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित केले आहे.
मुंब्रा रेतीबंदर परिसरातील ठाणे महापालिका शाळा क्रमांक ९३ जवळील राणानगरमध्ये राहणाऱ्या दगडू भांगरे यांच्या घराच्या मागील बाजूस अंदाजे १० बाय सहा फूट जमीन खचल्याने घराची मागील भिंत शेजारच्या नाल्यात कोसळली. त्यामुळे घराचा उर्वरित भाग धोकादायक झाल्याने संबधित घर रिकामे करून घरात राहणाऱ्या सहा जणांना सुरक्षेच्या दृष्टीने शेजारच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96407 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..