गोदामातील धान्यावर डुक्करांचा ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोदामातील धान्यावर डुक्करांचा ताव
गोदामातील धान्यावर डुक्करांचा ताव

गोदामातील धान्यावर डुक्करांचा ताव

sakal_logo
By

रोहा, ता. ११ (बातमीदार) ः शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भुवनेश्वर येथे रास्त भाव धान्यसाठा करणारे शासकीय गोदाम आहे. या गोदामात खाली पडलेले धान्य खाण्यासाठी डुकरांचा मुक्त वावर असून प्रशासनाचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे.
भुवनेश्वर येथे रास्त भाव धान्यसाठा करणारे शासकीय गोदाम आहे. या ठिकाणी ट्रकद्वारे दरमहा हजारो किलो तांदूळ, गहू व अन्य खाद्यपदार्थांचा साठा करून नंतर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात त्याचे वितरण केले जाते. या गोदाम परिसराचे काँक्रीटीकरण झाले नसल्याने भलेमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात बारमही चिखल असल्याने नेहमीच या परिसरात मोकाट डुकरांचा वावर असतो. अनेकदा हे डुक्कर गोदामात धान्यसाठा करताना जमिनीवर पडलेले धान्य खाण्यासाठी येत असतात. विशेष म्हणजे, जमिनीवर ताडपत्री असल्याने खाली पडलेले हे धान्य नंतर उचलून परत गोणीत भरून कालांतराने त्याचे वितरण केले जात असल्यामुळे याबाबत नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

कोट :
भुवनेश्वर येथे रास्त भाव धान्यसाठा करणारे शासकीय गोदामातील हा प्रकार खरच धक्कादायक आहे. या गोदामातून सर्वसामान्यांना धान्याचे वितरण होत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याची गरज आहे.
- दिलीप वडके, सामाजिक कार्यकर्ते

गोदाम परिसरात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातील चिखलात मोकाट डुकरे वास्तव्य करीत असल्याने हा परिसर काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केले आहे. लवकरात लवकर या कामाला मंजुरी देण्यात येईल.
- कविता जाधव, तहसीलदार, रोहा

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96409 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..