नवी मुंबईतील बेवारस वाहनांची कारवाई थंडावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईतील बेवारस वाहनांची कारवाई थंडावली
नवी मुंबईतील बेवारस वाहनांची कारवाई थंडावली

नवी मुंबईतील बेवारस वाहनांची कारवाई थंडावली

sakal_logo
By

नवी मुंबईतील बेवारस वाहनांची कारवाई थंडावली

तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : शहरात मागील वर्षभरापासून बेवारस वाहनांवर पालिकेची कारवाई थंडावल्याने अनेक वाहने वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून राहिली आहेत. पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस वाहनांमुळे शहर विद्रूप होत चालले आहे. विशेष म्हणजे अनेक वेळा या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांकडून या वाहनांची तक्रार वाहतूक पोलिसांकडे केली जाते. मात्र, वाहतूक पोलिस संबंधित जबाबदारी पालिकेची असल्याचे सांगतात. स्वच्छ भारत अभियानादरम्यान पालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारे बेवारस वाहनांवर कारवाईची मोहीम अतिशय वेगवान केली होती. २४ तासांपेक्षा जास्त काळ रस्त्यावर थांबलेल्या वाहनांना पालिकेमार्फत नोटीस दिली जात होती; तरीही वाहने न हटविल्यास पालिकेकडून संबंधितांना दंड आकारला जात होता. मात्र, पुन्हा एकदा बेवारस वाहनांचा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. अनेक वेळा ही वाहने कोणाची आहेत? ती मोकळ्या जागेवर कशी आली? याविषयी रहिवाशांना तसेच मनपालादेखील काहीच माहीत नसते. त्यामुळे कारवाई करण्यास अडचणीदेखील येतात. बेवारस वाहनांमुळे वाहतूक कोंडीचीदेखील समस्या निर्माण झाली आहे.

पालिकेकडून मध्यंतरी बेवारस वाहनांवर स्टिकर लावून कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, पुढे त्या वाहनांवर कोणतीच कारवाई झाली नाही. कारवाई केली जात नसल्याने सर्वत्र रस्त्याच्या कडेला बेवारस वाहनांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. स्वच्छ भारत अभियानाची फेरी सुरू झाली, की मनपा प्रशासन खडबडून जागे होत रस्त्यांवर असणाऱ्या बेवारस वाहनांचा पुरता सुपडा साफ केला जातो. मात्र स्वच्छ भारत अभियान संपताच सर्वत्र बेवारस वाहनांची संख्या वाढत जाते. त्यामुळे वाहन पार्कींगचे तीनतेरा वाजले जातात. बेवारस वाहनांमुळे जागा अडवली जात असल्याने इतरांना वाहने कुठे पार्क करावी, हा प्रश्न पडला जातो. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात पहिले येण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर बरेच दिवस धूळ खात उभी असलेली वाहने यामुळे स्वच्छता कार्यात अडथळा निर्माण होऊ नये, यांची खबरदारी प्रशासन घेते. स्वच्छ सर्वेक्षण संपताच पुन्हा बेवारस वाहनांची संख्या रस्त्यावर वाढू लागते. याबाबत अतिक्रमण उपायुक्त अमरीश पटणीगिरी यांना संपर्क केला; मात्र होऊ शकला नाही.

चौकट
वाहनांखाली कचरा, हिरवळ
बहुतांश चौकात, सोसायटीच्या आवारात याशिवाय कोपरखैरणेमधील खाडीलगतच्या रस्त्यावर, एपीएमसी मार्केट, एमआयडीसी आदी ठिकाणी अशा प्रकारची बेवारस वाहने उभी आहेत. या वाहनांमुळे परिसराचे विद्रूपीकरण होतेच. त्याव्यतिरिक्त या गाड्यांच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली असते. ही वाहने धुळीने भरलेली असतात. तसेच या गाड्यांच्या खाली मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतो. त्यामुळे मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांना व्यवस्थित सफाईदेखील करता येत नाही. पावसाळा सुरू असल्याने काही वाहनांखाली गवत उगवले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96413 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..