ऐन पावसात मेट्रो पिल्लर, खांबांना रंगरंगोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐन पावसात मेट्रो पिल्लर, खांबांना रंगरंगोटी
ऐन पावसात मेट्रो पिल्लर, खांबांना रंगरंगोटी

ऐन पावसात मेट्रो पिल्लर, खांबांना रंगरंगोटी

sakal_logo
By

ऐन पावसात मेट्रो स्थानक, खांबांना रंगरंगोटी

खारघर, ता. ११ (बातमीदार) : सिडकोकडून ऐन पावसात नवी मुंबई मेट्रो स्थानक आणि खांबांना रंगरंगोटी करून जनतेच्या पैशांची नासाडी करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोकडून अत्यावश्यक सर्व चाचण्या झाल्या. पेंधर ते सेंट्रल पार्कदरम्यान पहिल्या टप्प्यात मेट्रो सुरू करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, मेट्रो सेवा शुभारंभासाठी अजूनही मुहूर्त मिळाला नाही. दरम्यान, रंगरंगोटी करणारे कामगार तसेच काही नागरिकांकडे विचारणा केली असता, ज्या ठिकाणी भिंतीला पाणी लागत नाही अशा सुकलेल्या आणि कोरड्या भिंतीवर रंगरंगोटी केले जाते. रंगरंगोटी करणाऱ्या कामगारांकडे विचारणा केली असता, पावसाळ्यात रंगरंगोटी केली जात नाही. मात्र वरिष्ठांच्या आदेशानुसार काम सुरू आहे, सिडकोकडून सीबीडी-बेलापूर ते पेंधर स्थानकादरम्यान उभारलेल्या मेट्रो स्थानक, तसेच खांबांना ऐन पावसाळ्यात रंगरंगोटी करून जनतेच्या पैशांची नासाडी करीत असल्याचे सांगितले. याविषयी सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96418 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..