दहिसरचे मार्ग प्रकाशमय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहिसरचे मार्ग प्रकाशमय
दहिसरचे मार्ग प्रकाशमय

दहिसरचे मार्ग प्रकाशमय

sakal_logo
By

कांदिवली, ता. ११ (बातमीदार) ः दहिसर विभागात बहुतांशी मार्गावर अपुरे दिवे आणि मंद प्रकाश यामुळे रात्रीच्या वेळेस ज्येष्ठ नागरिकांसह, प्रवासी आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स रेसिडेन्ट असोसिएशनचे सरचिटणीस विवेक निचानी आणि वृत्तपत्र लेखक दत्ताराम घुगे यांनी स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांना पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. त्‍यावर येथे अधिक क्षमतेचे सफेद दिवे आणि विजेचे खांब वाढविण्यात आले आहेत. त्‍यामुळे येथील सर्व मार्ग प्रकाशाने उजळल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
दहिसर विधानसभा क्षेत्राच्या विद्यमान आमदार मनीषा चौधरी यांच्या प्रयत्नाने मुंबई महापालिका आणि आदाणी वीजपुरवठा कंपनीतर्फे जागोजागी प्रखर दिवे बसविण्याचे काम जलद गतीने सुरू झाले आहे. शेवटच्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स, शक्तीनगर, जीएसबी सरस्वती गार्डन ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, एन. एल. संकुलातील हमरस्त्यावर विजेरी प्रखर उजेडातील दिवे, जंक्शन चौकात व्ही. आकाराचे चौफेर उजेड देणारे दिवे लावण्यात येत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96421 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..