महामार्गावरील उड्डाणपुलावरील वीज सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावरील उड्डाणपुलावरील वीज सुरु
महामार्गावरील उड्डाणपुलावरील वीज सुरु

महामार्गावरील उड्डाणपुलावरील वीज सुरु

sakal_logo
By

कासा, ता. ११ (बातमीदार) ः येथील महालक्ष्मी व चारोटी उड्डाणपुलावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद होते. त्यामुळे पुलावर अपघात होण्याचे प्रकारही अनेकदा घडत असत. विजेचे बिल न भरल्याने येथील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता; पण वीजबिल भरल्याने आता शनिवारपासून (ता. १०) दिवे पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

महामार्गावर नवीन टोल कंपनी आल्याने वीजबिल भरले गेले नव्हते. महावितरणकडून अनेकदा वीजबिले भरण्यास सांगण्यात आले होते. याबाबतची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रकाशितक करण्यात आली होती. पण, बिल भरल्याने येथील दिवे सुरू करण्यात आले आहेत. पण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित असल्याने अर्ध्याहून अधिक दिवे बंदच आहेत. बिलाविषयी एनएचआयच्या अधिकारी एच. जालान यांना विचारणा केली असता, बिलाची थकबाकी असल्याचे टोल कंपनीने कळवले नव्हते. त्यामुळे उशीर झाला, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, अजूनही विजेचे खांब, वायरची दुरुस्ती करणे बाकी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96434 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..