शिवसेनेच्या दोन गटांत राडा प्रभादेवीत राजकीय तणाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेच्या दोन गटांत राडा
प्रभादेवीत राजकीय तणाव
शिवसेनेच्या दोन गटांत राडा प्रभादेवीत राजकीय तणाव

शिवसेनेच्या दोन गटांत राडा प्रभादेवीत राजकीय तणाव

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : गणेशमूर्ती विसर्जनप्रसंगी शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात झालेल्या वादावादीनंतर शनिवारी (ता. १०) रात्री शिंदे गटाच्या संतोष तेलवणे यांना मारहाण झाली. त्यानंतर रविवारी शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत आणि पाच जणांवर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्यामुळे शिवसैनिक अधिक आक्रमक झाले होते. हे पाचही उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिक असून रविवारी दुपारी जामिनावर त्यांची सुटका झाली. दादर परिसरात या प्रकरणात आमदार सरवणकरांसह ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश सावंत आणि इतर शिवसैनिकांच्या अटकेनंतर शिवसैनिकांनी दादर पोलिस ठाण्यात मोर्चा नेत आमदार सदा सरवणकर व समाधान सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत इथून हटणार नाही, अशी भूमिका घेतली होती. शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी दादर पोलिस ठाण्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी शिवसेना कार्यकर्त्यांवर कलम ३९५ अंतर्गत लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. पोलिस ठाण्याबाहेर शिवसैनिकांनी गर्दी करत घोषणाबाजी केली. तसेच गोळीबार करून गुंडागर्दी करणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
...
सरवणकरांवर गुन्हा दाखल
एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. यामुळे प्रभादेवीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आमदार सदा सरवणकर आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध कायदा सुव्यवस्था बिघडवणे आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या आरोपाखाली आणखी एक गुन्हा दादर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
...
कार्यालयावर दगडफेक
सदा सरवणकर यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. उत्सवाची संस्कृती जपण्याऐवजी गैरवर्तवणुकीचे प्रकार घडत आहेत, ही दुर्दैवाची बाब असल्याची चर्चा परिसरात होत आहे. खासदार अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर, ॲड. अनिल परब, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, किशोरी पेडणेकर यांनी बाजू मांडल्यानंतर पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96447 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..