सहायक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहायक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या
सहायक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

सहायक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) ः महापालिकेतील सहायक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. ठाणे अँटीकरप्शनने प्रभाग समिती ४ चे सहायक आयुक्त, मुकादम, सफाई कामगार यांच्यावर कारवाई केली होती. या कारवाईनंतर आयुक्त अजीत शेख यांनी या बदल्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

मुकादम रतन जाधव व सफाई कामगार विजय तेजी यांना एका बांधकामधारकाकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मागील आठवड्यात अटक करण्यात आली होती. या तिघांवर निलंबनाची कारवाई करण्याचे संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिले असून सहायक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. त्यात महेंद्र पंजाबी यांच्या जागी प्रभाग समिती १ चे सहायक आयुक्त गणेश शिंपी, प्रभाग ३ चे सहायक आयुक्त अजित गोवारी यांची प्रभाग समिती १, भांडार विभागाचे दत्तात्रय जाधव यांची प्रभाग समिती ३ आणि अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांचे स्वीय सहाय्य अंकुश कदम यांची भांडार विभाग अशा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. सहायक आयुक्त तुषार सोनवणे यांना प्रभाग समिती २ मध्ये कायम ठेवण्यात आले आहे. गणेश शिंपी हे २०१५ पासून सहायक आयुक्त असून त्यांनी विविध प्रभाग समित्या हाताळल्या आहेत. याशिवाय शिंपी प्रभाग १ ते ४ पर्यंतचे नोडल ऑफिसर आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96459 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..