तारागिरीचे दिमाखात लॉचिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तारागिरीचे दिमाखात लॉचिंग
तारागिरीचे दिमाखात लॉचिंग

तारागिरीचे दिमाखात लॉचिंग

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’बाबतची चर्चा सुरू असतानाच आज (ता. ११) भारतीय नौदलाचे स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट ‘तारागिरी’ लाँच करण्यात आली आहे. माझगाव डॉकमध्ये हा कार्यक्रम पार पडला. व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, वेस्टर्न नेव्हल कमांड या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनामुळे एका दिवसाचे राजकीय शोक केंद्र सरकारने जाहीर केला. या पार्श्वभूमीवर दिमाखात होणारे तारागिरीचा लॉन्चिंग सोहळा साधेपणाने पार पडला.
तारागिरी हे नाव गढवालमध्ये असलेल्या हिमालयातील पर्वतावरून पडले आहे. प्रोजेक्ट १७A फ्रिगेट्सचे हे पाचवे जहाज आहे. ही जहाजे पी १७ फ्रिगेट्सची अपग्रेड केलेली आवृत्ती असून ती सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये, अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालीने सुसज्ज आहेत. तारागिरी ही पूर्वीच्या तारागिरी, लिएंडर वर्गाच्या फ्रिगेट जहाजाची पुनर्रचना आहे. तारागिरी प्रकल्पातील पोलादी कण्याचे (कील)चे काम हे १० सप्टेंबर २०२० मध्ये सुरू करण्यात आले होते, तर ऑगस्ट २०२५ मध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत येणे अपेक्षित आहे. याआधीच माझगाव डॉक लिमिटेडने उदयगिरी आणि सूरत या युद्धनौकांचे लाँचिंग नुकतेच केले होते. संपूर्ण तारागिरीचे काम हे इंटिग्रेटेड कंस्ट्रक्शन मेथडॉलॉजी या पद्धतीने करण्यात आले आहे. त्यामध्ये ब्लॉकची निर्मिती विविध ठिकाणी करूनच माझगाव डॉक लिमिटेड येथे हे सुटे भाग एकत्र जोडण्यात आले आहेत. जवळपास ३,५१० टनांची युद्धनौका नौदलात सामील झाली आहे.
...
तारागिरीची वैशिष्‍ट्ये
ब्युरो ऑफ नेव्हल डिझाईन या संस्थेच्या माध्यमातून या युद्धनौकेचे डिझाईन करण्यात आले आहे. माझगाव डॉक लिमिटेडच्या माध्यमातून डिटेल डिझाईन आणि युद्धनौका बांधणीचे काम हे करण्यात आले आहे. दोन गॅस टर्बाईन्स तसेच २ डिझेल इंजिन आहेत. शस्त्रे, सेन्सर, एडव्हान्स एक्शन इन्फॉर्मेशन सिस्टिमचा वापरही युद्धनौकेसाठी करण्यात आला आहे. तसेच रॉकेट लाँचरचे फीचरही समाविष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96464 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..