सुशोभीकरणाला विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुशोभीकरणाला विरोध
सुशोभीकरणाला विरोध

सुशोभीकरणाला विरोध

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. ११ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील झिडके-अंबाडी नाका सुशोभीकरण या कामाकरिता केंद्र सरकारकडून सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून रस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या पक्क्या गटारीचे बांधकाम व दोन्ही बाजूंचे सेवा रस्ता आदी कामे पूर्ण करावयाची आहेत. मात्र या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने पर्यायी मार्ग न दिल्याने व अंबाडी नाका या ठिकाणी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने नाक्याचे विद्रूपीकरण होत आहे. गटारींचे बांधकाम करताना पाणी शेतकरी व जमीनमालक, तसेच व्यावसायिक यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत हानिकारक आहे. याबाबतची तक्रार संबंधित शेतकरी व जमीनमालक, तसेच व्यावसायिक यांनी मुख्यमंत्री आणि ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सन २००८ मध्ये भिवंडी-वाडा-मनोर हा रस्ता चौपदरीकरण करण्यात आला. त्या वेळी झिडके-अंबाडी नाका येथे उड्डाणपूल बांधण्यात आला. या उड्डाणपुलाचे बांधकाम करताना, पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे वाहून जाणारे शेतजमिनीचे पाणी ते मार्ग म्हणजेच मोऱ्या कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत. या बांधकाम विभागाच्या चुकीच्या व नियमबाह्य कामामुळेच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुराचे पाणी रस्त्यालगत वा जवळपास असणाऱ्या घरात, तसेच दुकानात जाऊन आर्थिक नुकसान होते. त्यामुळे येथील स्थानिक शेतकरी व जमीनमालक, तसेच व्यावसायिक संताप व्यक्त करीत आहेत. हे नियमबाह्य काम बंद करण्याची मागणी करत आहेत.

काम बंद करण्याचा इशारा
संबंधित कामाबाबत शेतकरी व जमीनमालक, तसेच व्यावसायिक यांना माहिती दिली जात नाही. विश्वासात न घेताच एकतर्फी काम करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित काम बंद करण्याचा निर्णय बाधितांनी घेतला आहे. जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग शेतकरी व जमीनमालक, तसेच व्यावसायिक यांना कामाबाबत योग्य व समाधानकारक माहिती देणार नाहीत, तोपर्यंत सदरचे काम बंद केले जाणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.

अंबाडी नाक्याचे सुशोभीकरण करत असताना स्थानिक दुकानदार यांना विश्वासात घेतले जात नाही, तोपर्यंत हे काम प्रशासनाने थांबवावे.
- के. डी. पाटील,
ेंशेतकरी, झिडके

रस्त्याचे सुशोभीकरणाचे काम व गटारे दुरुस्ती करीत असताना कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. तसेच दुकानदार बाधित होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. संबंधित ठेकेदार यांना सूचना दिली आहे.
- अनिल पवार,
कनिष्ठ अभियंता, भिवंडी सार्वजनिक विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96465 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..