चाकूहल्लाप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकूहल्लाप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल
चाकूहल्लाप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल

चाकूहल्लाप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल

sakal_logo
By

भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : भिवंडी शहर पोलिस ठाण्यात विरोधकांवर तक्रार देऊन रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तरुणाने सहकाऱ्यांसह विरोधकांवर चाकूहल्ला केला. या प्रकरणी डॉ. प्रतीक प्रदीप भोईर यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात तक्रार दाखल केली.

शहरातील गैबीनगरमध्ये राहणारा नवाज खान हा समदनगरमध्ये त्याच्या हरविलेल्या दुचाकीबाबत विचारणा करण्यासाठी आला असता त्याच्यावर चार जणांनी हल्ला करून जखमी केले. त्यामुळे त्यास भिवंडी शहर पोलिसांनी उपचाराकरिता इंदिरा गांधी रुग्णालयात पाठविले होते. त्याचप्रमाणे या हाणामारीत जखमी झालेला विरोधक मेहमूद अख्तर सलीम अन्सारी ऊर्फ पप्पू याला देखील पोलिसांनी त्याच रुग्णालयात पाठविले होते. त्या विरोधकास पाहून नवाज व त्याच्या सोबतच्या तीन व्यक्तींनी मेहमूद अख्तर यास मारहाण करून चाकूने गंभीर जखमी केले. तसेच डॉक्टरांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा केला. तसेच रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली. त्यामुळे रुग्णालयाचे सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले, अशी तक्रार डॉ. भोईर यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणासही अटक केली नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96468 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..