विजांच्या कडकडाटाची नागरिकांत भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजांच्या कडकडाटाची नागरिकांत भीती
विजांच्या कडकडाटाची नागरिकांत भीती

विजांच्या कडकडाटाची नागरिकांत भीती

sakal_logo
By

माणगाव, ता. ११ (बातमीदार) ः परिसरात रविवारी (ता. ११) दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सध्या पूर्वा नक्षत्र सुरू आहे. उत्तरा नक्षत्रात पावसाचा जोर कमी होऊन पाऊस उतरणीला लागेल, असे सांगितले जात आहे; पण सध्या विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसाची भीती नागरिकांत पसरली आहे.

पावसाचे चिन्ह दिसताच लोक काळजीपोटी आपल्या घरातील लाईट कनेक्शन, इंटरनेट कनेक्शन बंद करून ठेवत आहेत. काही ठिकाणी वीज जोडणी सुरू राहिल्याने नुकसान होऊन आर्थिक फटका बसल्याची चर्चा नागरिक करत आहेत. पाऊस कितीही पडू देत, पण विजांच्या कडकडाट नको, अशी भावना नागरिक बोलून दाखवत आहेत. अनेक भागात विजा पडल्याने घरगुती वापरातील इलेक्ट्रानिक वस्तू, फ्रिज, टीव्ही, कम्प्युटर, राऊटर, इनव्हर्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटनांची लोकांमध्ये चर्चा आहे. ढगफुटीप्रमाणे पडणाऱ्या पावसाची व कडकडणाऱ्या विजेची जबरदस्त दहशत जनमानसात दिसत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96470 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..