भिवंडीत १३२ कोटींचा जीएसटी घोटाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत १३२ कोटींचा जीएसटी घोटाळा
भिवंडीत १३२ कोटींचा जीएसटी घोटाळा

भिवंडीत १३२ कोटींचा जीएसटी घोटाळा

sakal_logo
By

भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : १३२ कोटींचा जीएसटी घोटाळा करणाऱ्यास केंद्रीय जीएसटी विभागाच्या भिवंडी आयुक्त कार्यालयाने अटक केली आहे. बनावट कंपन्यांच्या नावे प्रत्यक्ष विक्री अथवा सेवा न पुरवता अधिक किमतीची बिले बनवली. या बिलाच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवत आरोपीने हा घोटाळा केल्याचे सांगितले जात आहे.


भिवंडीत यंत्रमाग आणि गोदाम हे दोन मोठे व्यवसाय आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून काही व्यापाऱ्यांनी वेगवेगळे सरकारी कर चुकवून आपले व्यवसाय स्थिर केले आहेत. अशा व्यापाऱ्यांसाठी काम करीत असलेल्या हसमुख पटेल याने बनावट कंपन्यांच्या आडून कोणत्याही वस्तूंची विक्री अथवा सेवा न पुरवता अधिक किमतीची विक्री बिले विविध व्यावसायिक कंपन्यांना वितरित केली. या बनावट कंपन्यांच्या नावे जीएसटी सुरू करून १३२ कोटी रुपयांची बिले जारी केली. त्यानंतर त्याच बिलांच्या आधारे २३ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवल्याचा प्रकार समोर आल्याची माहिती केंद्रीय जीएसटीच्या भिवंडी विभागीय कार्यालयास मिळाली. या प्रकरणी जीएसटी चोरीला आळा घालणाऱ्या प्रतिबंधक शाखेकडून (भरारी पथक) या बनावट कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरू असताना या सर्व प्रकरणाचा म्होरक्या हसमुख पटेल असल्याचे समोर आले. पुराव्याच्या आधारे आरोपीला ९ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता त्यास २३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय जीएसटी विभागाच्या भिवंडी आयुक्त यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96474 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..