मुंबई विमानतळावर पाच कोटींचे १२ किलो सोने जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विमानतळावर पाच कोटींचे १२ किलो सोने जप्त
मुंबई विमानतळावर पाच कोटींचे १२ किलो सोने जप्त

मुंबई विमानतळावर पाच कोटींचे १२ किलो सोने जप्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ११ : आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत तस्करीसाठी आणलेले तब्बल १२ किलो सोने जप्त केले आहे. बिस्किटाच्या स्वरूपात असलेल्या या सोन्याची किंमत पाच कोटी ३८ लाख रुपये आहे. तस्करांनी सोन्याची बिस्किटे एका बेल्टमध्ये लपवली होती; मात्र अधिकाऱ्यांनी तस्करीचा डाव उधळून लावला. या प्रकरणी सुदान येथून आलेल्या ६ जणांना ताब्यात घेतले आहे. विमानतळावर जप्त केलेली सोन्याचे बिस्किटे विदेशात घेऊन जाण्यात येत होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने कुठून आले आणि ते कुणाकडून आणले याचा तपास केला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96484 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..