विसर्जनावेळी ११० पोलिस मित्र स्वयंसेवकांची सहकार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्जनावेळी ११० पोलिस मित्र स्वयंसेवकांची सहकार्य
विसर्जनावेळी ११० पोलिस मित्र स्वयंसेवकांची सहकार्य

विसर्जनावेळी ११० पोलिस मित्र स्वयंसेवकांची सहकार्य

sakal_logo
By

बोईसर, ता. १२ (बातमीदार) : शांतता व सुव्यवस्थेचा पोलिसांवरील भार कमी व्हावा, यासाठी पोलिस मित्र संघटना काम करते. यंदा गणेशमूर्ती विसर्जनावेळी ११० स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते, असे संघटनेकडून सांगण्यात आले.

पोलिस मित्र संघटना ही मागील ३५ वर्षांपासून राज्यभर कार्यरत आहे. पोलिसांवरील वाढता ताणतणाव कमी करण्यासाठी सण-उत्सव, मोर्चे आणि मिरवणुका इत्यादी ठिकाणी गरज भासल्यास मदत व सहकार्य करण्याचे काम ही संघटना करते. संघटनेच्या पालघर जिल्हा अध्यक्ष सुलक्षण पाटील यांनी पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना निवेदन देत मदतीची विनंती केली होती. पोलिसांनी तात्काळ मंजुरी देत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. पोलिस मित्र संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा सचिव राजेश संखे, रंजना संखे, छगन पाटील, अमोल पवार यांच्या देखरेखीखाली पालघर, बोईसर, सफाळे, सातपाटी, मनोर, वानगाव, डहाणू, तलासरी इत्यादी विभागातील खेड्यापाड्यांतील, गावांतील तसेच शहरातील सार्वजनिक गणपती विसर्जनाच्या ठिकाणी पोलिस मित्र संघटनेचे ११० स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. गर्दीच्या ठिकाणी उत्सवाचे भान हरपलेल्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांसोबत संघटनेच्या स्वयंसेवकांनी मदत केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96499 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..