पर्यावरण रक्षणासाठी तरुण सरसावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरण रक्षणासाठी तरुण सरसावले
पर्यावरण रक्षणासाठी तरुण सरसावले

पर्यावरण रक्षणासाठी तरुण सरसावले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : निर्माल्य पाण्यात टाकल्यामुळे जलप्रदूषण होतेच, शिवाय त्यामुळे जलचरांना देखील धोका उत्पन्न होतो. गणेशोत्सवात अनेक भाविक निर्माण होणारे निर्माल्य विसर्जनाच्या वेळी तलावात, नदीत टाकतात. यामुळे निर्माण होणाऱ्या जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘निर्मल युथ फाऊंडेशन’च्या वतीने जनजागृती करण्यात आली. बाप्पाच्या विसर्जनात भक्तगण तल्लीन असताना तरुण मात्र पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सरसावले होते. निर्मल फाऊंडेशनच्या तरुणांनी निर्माल्य संकलन करून खतनिर्मिती प्रकल्पास दिले आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात ११ ठिकाणी निर्मल युथ फाऊंडेशनच्या वतीने सुमारे २०० स्वयंसेवकांसोबत निर्माल्य संकलनाचे काम करण्यात आले. कोपर, जुनी डोंबिवली, रेतीबंदर, सातपूल जेट्टी, कुंभारखाणपाडा, आयरे गाव, नांदिवली, खंबालपाडा, दत्तनगर चौक, ट्राफिक बगीचा, अंबिका मैदान आदी ठिकाणी प्रगती महाविद्यालय व दि एसआयए महाविद्यालयातील एनएसएस युनिटच्या स्वयंसेवकांसोबत प्रत्येक घाटावरील निर्माल्य वेगळे करण्यात आले.
‘निर्मल युथ फाऊंडेशन’च्या अध्यक्षा अक्षता औटी व उपाध्यक्षा विनिता चाहेर यांच्या देखरेखीखाली संपूर्ण उपक्रम पार पडला. पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शैवले यांचे मार्गदर्शन व कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त अतुल पाटील यांनी भेट देऊन मुलांचे प्रोत्साहन वाढवले. तसेच, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी व स्थानिक नगरसेवकांकडून मोलाचे योगदान लाभल्याचे फाऊंडेशनच्‍या उपाध्यक्षा विनिता चाहेर व स्वयंसेवक यश पवार यांनी सांगितले.
११ गणेश घाटांवर कचऱ्याचे वर्गीकरण
जलस्रोतांमध्ये निर्माल्य व प्लास्टिक टाकल्याने प्रदूषण वाढते व जलचरांना त्याचा त्रास होतो. पर्यावरणीय अधिवासालाही यामुळे धोका निर्माण होतो. जैवविविधता नष्ट होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होतो. या सर्वांच्या बचावासाठी निर्मल युथ फाऊंडेशन गेल्‍या सात वर्षांपासून हे काम करीत आहे. यावर्षी ११ गणेश घाटांवर सुमारे २९ टन ६५० किलो ओला कचरा व ८ टन ९४० किलो सुका कचरा वर्गीकरण करण्यास या तरुणांना यश आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96500 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..