वसईत बविआ-शिवसेनेत रंगणार सामना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत बविआ-शिवसेनेत रंगणार सामना
वसईत बविआ-शिवसेनेत रंगणार सामना

वसईत बविआ-शिवसेनेत रंगणार सामना

sakal_logo
By

संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. १२ : वसई तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, या निवडणुकीत शिवसेना विरोधात बविआ असा सामना रंगणार आहे. निवडणूक जाहीर झालेल्या ११ ग्रामपंचायतीपैकी २ ग्रामपंचायती या शिवसेनेकडे असून उर्वरित ९ ग्रामपंचायतींवर बविआचा झेंडा आहे. राज्यात सत्तेची समीकरणे बदलली असली तरी आजही ग्रामीण भागातील शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याने सत्ता बदलानंतर होणाऱ्या या पहिल्या निवडणुकीत सेना काय करते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
वसई तालुक्यातील पूर्वेकडील भागात असलेल्या ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १३ ऑक्टोबरला होत आहेत. निवडणूक असलेल्या ११ ग्रामपंचायतीपैकी चंद्रपाडा ही ग्रामपंचायत शिवसेनेकडे आहे; तर देपोवली माजिवली ही ग्रामपंचायत श्रमजीवी संघटना आणि सेना यांच्या युतीकडे आहे. उर्वरित पोमण, शिवनसई, उसगाव, शिरवली, मेढा-वडघर, खानिवडे, भाताणे आणि आढणे भिणार या ग्रामपंचायती बहुजन विकास आघाडीकडे आहेत. ग्रामीण भागात आजही शिवसेनेला मानणारा मोठा समुदाय आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या निवडणुकीत या ठिकाणी बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना असाच सामना रंगला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासींची वस्ती असल्याने बविआ, सेनेबरोबरच श्रमजीवी संघटनेचेही प्राबल्य राहिले आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर श्रमजीवी संघटना शिवसेनेला बरोबर घेणार की स्वतंत्र निवडणूक लढविणार, हे येत्या दोन ते तीन दिवसांत स्पष्ट होणार आहे. बहुजन विकास आघाडीने निवडणुकीसाठी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. शिवसेनेने आपली रणनीती स्पष्ट केली नसली तरी आपली ताकद आजमावण्यासाठी सेना स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यातील अनेक आमदार, खासदार आणि शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जात असले तरी वसई तालुक्यातील चार दोन नेते वगळता शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिला आहे; तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही या निवडणुकीत उतरून आपले बळ जोखण्याचा प्रयत्न करणार असल्याने सध्या तरी दोन शिवसेना निवडणुकीत दिसण्याचीही श्यक्यता आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे आपले उमेदवार निवडणुकीत उतरविणार असली तरी खरी लढत ही सेना विरोधात बविआ अशीच रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96501 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..