कर्जतमध्ये ठाकरे गटाला धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जतमध्ये ठाकरे गटाला धक्का
कर्जतमध्ये ठाकरे गटाला धक्का

कर्जतमध्ये ठाकरे गटाला धक्का

sakal_logo
By

कर्जत, ता. १२ (बातमीदार) ः शिवसेनेचे ठाकरे गटातील कर्जत शहर प्रमुख भालचंद्र जोशी यांनी उरणचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. वैयक्तिक कारणास्तव संघटनेला वेळ देता येत नसल्याने राजीनामा देत असल्याचे कारण जोशी यांनी दिले आहे. मात्र, अचानक घडलेल्या या घडामोडीमुळे शहरात मात्र विविध तर्क-वितर्क काढले जात आहेत.
गेली आठ वर्षे कर्जत शहर प्रमुख म्हणून भालचंद्र जोशी कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात पक्ष व संघटना बांधणीचे काम देखील चांगल्या प्रकारे सुरू होते. अशातच भालचंद्र जोशी यांनी संघटनेला वेळ देता येत नसल्यामुळे संघटना मजबूत करणाऱ्या नव्या शहर प्रमुखाची आवश्यकता असल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणामुळे पक्ष संघटनेचा राजीनामा दिल्याचे कारण दिले आहे. शिवाय जानेवारी २०२४ रोजी कर्जत नगर परिषदेची निवडणूक होणार असून नवीन शहर प्रमुखास पक्ष बांधणीस पुरेसा कालावधी मिळेल, असेही ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे आणि शिवसेना सचिव यांच्याकडे पाठविलेल्या राजीनाम्यात नमूद केले आहे.

कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे ठाकरे आणि शिंदे गटात पक्ष संघटना मोठ्या प्रमाणात मजबूत करण्याकडे भर दिला जात आहे. यासाठीच्या बैठका, मेळावे, दौरे सुरू आहेत; तर काही ठिकाणी पक्ष प्रवेशाचे वारे वाहत आहेत. आमचा गट सक्षम हे दाखविण्याकडे आमदार-खासदारांनी ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे दिवसागणिक बदलणाऱ्या राजकारणातील समीकरणांमुळे कोणत्या गटात जाऊ, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96508 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..