स्मशानभूमीचे नूतनीकरण सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मशानभूमीचे नूतनीकरण सुरू
स्मशानभूमीचे नूतनीकरण सुरू

स्मशानभूमीचे नूतनीकरण सुरू

sakal_logo
By

मुलुंड, ता. १२ (बातमीदार) ः ‘मुलुंडमधील स्मशानाची दुरवस्था’ या मथळ्याखाली ‘सकाळ’मध्ये १५ ऑगस्ट रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल संबंधित प्रशासनाने घेतली असून मुलुंड पूर्वेतील स्मशानभूमीचे नूतनीकरणाचे काम सुरू झाले आहे. याबद्दल नारिकांनी समाधान व्‍यक्‍त केले आहे.
स्‍मशानभूमीच्‍या सभागृहातील इलेक्ट्रिक बोर्डच्या भिंतींना पावसाच्या पाण्यामुळे ओल धरला होता. परिणामी शॉर्ट सर्किटच्या घटना येथे घडत होत्या. तसेच गॅस दाहिनीचे काम देखील अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. सुमारे ४ एकर जागेमध्ये असलेल्या या सर्वधर्मीय स्मशानभूमीमध्ये अनेक समस्या होत्‍या. या समस्यांचा पाढा सामाजिक कार्यकर्ते रवी नाईक आणि नंदू वैती यांनी खासदार मनोज कोटक यांच्या दालनात घेतलेल्या बैठकीत वाचून दाखवला होता. अखेर त्याला यश आले आहे. मानवी हक्क आयोगाने देखील या समस्येची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या. परिणामी संबंधित प्रशासनातर्फे स्मशानभूमीच्या कामाची निविदा काढण्यात आली आणि सध्या येथील दुरुस्ती सुरू झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96512 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..