रबाळे स्थानकांत बेघरांचा आश्रय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रबाळे स्थानकांत बेघरांचा आश्रय
रबाळे स्थानकांत बेघरांचा आश्रय

रबाळे स्थानकांत बेघरांचा आश्रय

sakal_logo
By

वाशी, ता. १२ (बातमीदार) ः आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक केंद्र असणाऱ्या टीटीसी इंडस्ट्रीयलमधील मुख्य झोन म्हणून रबाळे स्थानकाची ओळख आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर दररोज येणाऱ्या कामगारांच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थानक म्हणूनदेखील रबाळे रेल्वेस्थानकाची ओळख आहे. पण या रेल्वेस्थानकात बेघरांनी आश्रयासोबत विविध समस्यांचेही ग्रहण लागल्याने प्रवाशांचा दैनंदिन प्रवास त्रासदायक झाला आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांमध्ये रबाळे स्थानकाचा समावेश होतो. या स्थानकातून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक केंद्र असणाऱ्या टीटीसी इंडस्ट्रीयल क्षेत्रात नोकरी, व्यवसायानिमित्त येत असतात. त्यामुळे रबाळे स्थानक कामगार वर्गाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. पण या स्थानकातील फलाटांवरील घाणीचे साम्राज्य, बंद असलेल्या तिकीट खिडक्या, बेघरांचा असलेला वावर अशा विविध समस्यांनी ग्रासले आहे.

स्थानकातील समस्या ः
तिकिटासाठी प्रदक्षिणाची वेळ
रबाळे रेल्वेस्थानकातील पूर्वेकडे असणारे तिकीट घर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी आपल्या प्रयत्नाने सुरू झाल्याचे सांगत मोठा गाजावाजा केला होता. मात्र अवघ्या आठवडभरानंतरच या तिकीट खिडक्या पुन्हा बंद झाल्या आहेत. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच रेल्वेस्थानकाला प्रदक्षिणा घालत तिकीट काढावे लागते.

फलाटांवर घाणीचे साम्राज्य
रेल्वेस्थानकांमधील फलाटांवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दैनंदिन स्वच्छता होत नसल्यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. पंखेदेखील नादुरुस्त असल्यामुळे काही ठिकाणांचे पंखे बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास होतो.

प्रेमीयुगुलांचा वावर
रेल्वेस्थानकाच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या झोपडपट्टीमधील रहिवाशी रेल्वेस्थानकांच्या ठिकाणी ठिय्या मांडतात. रेल्वेस्थानकांच्या बाजूला असणाऱ्या झोपडपट्टीमुळे महिलांना रात्रीच्या वेळी वावर करणे भीतीदायक वाटते. रबाळे रेल्वेस्थानकांच्या पूर्वे बाजूस काही प्रेमीयुगुलांनी आश्रयस्थान बनवले आहे.

पिण्याच्या पाण्याची गैरसोय
रेल्वेस्थानकाच्या भुयारी मार्गामध्ये अस्वच्छता आहे. रेल्वेस्थानकांवर इंडिकेटर कधी सुरू असते, तर कधी ते बंद असते. पिण्याच्या पाण्याचे कुलर नाही, तर पाणपोईमधील पाण्याचे नळ तुटलेले आहेत.

भटक्या कुत्र्यांचा वावर
या स्थानकांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. त्यामुळे भटक्या कुत्र्यांपासून सावध राहवे लागते. रबाळेमधील असणाऱ्या शौचालयांची अवस्था दयनीय आहे. त्या ठिकाणी अस्वच्छता असते.

महिला वर्ग असुरक्षित
सुरक्षा रक्षकांच्या ठिकाणी कधी सुरक्षा रक्षकच नसतात. मोठ्या प्रमाणात एमआयडीसीमध्ये महिला कर्मचारी असतात. पण महिला सुरक्षा कर्मचारी नसतात. त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. फलाटांवर सीसी टीव्ही आहेत, पण प्रवेशद्वारांवर सीसी टीव्ही नसल्याने स्टेशन परिसरालगत फेरीवाल्यांचा विळखा आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकामधून बाहेर पडल्यानंतर प्रवाशांना फेरीवाल्यांचा त्रास सहन करावा लागतो.
--------------------------------------------
रबाळे रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेस असणारी तिकीट खिडकी बंद असल्यामुळे पूर्वेस तिकीट काढण्यासाठी जावे लागते. तसेच भुयारी मार्गामध्ये अस्वच्छता असते. तसेच रात्रीच्या वेळी अंधार असल्याने येथून प्रवास करताना भीती वाटते.
- प्रिती सुमरा, महिला प्रवासी
---------------------------------------
स्थानकाच्या बाजूला असणाऱ्या झोपडपट्टीतील मुलांचा वावर या ठिकाणी असतो. स्टेशनवर पिण्याच्या पाण्याच्या पाणपोईची दयनीय अवस्था आहे. या रेल्वेस्थानकात मोठ्या प्रमाणात कामगार प्रवास करतो; पण बाकड्यांची संख्या अपुरी असल्यामुळे ताटकळत उभे राहून रेल्वेची वाट बघावे लागते.
- सागर कांबळे, प्रवासी
--------------------------------------
रबाळे रेल्वेस्थानकामध्ये अस्वच्छता पसरली आहे. याबाबतची पाहणी लवकरच करण्यात येणार आहे. तसेच स्थानकातील अन्य समस्याही मार्गी लावण्यात येतील.
- मिलिंद रावराणे, अभियंता, सिडको

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96529 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..