श्री गणेश विद्या मंदिर शाळेत शिक्षक दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री गणेश विद्या मंदिर शाळेत शिक्षक दिन
श्री गणेश विद्या मंदिर शाळेत शिक्षक दिन

श्री गणेश विद्या मंदिर शाळेत शिक्षक दिन

sakal_logo
By

धारावी, ता. १२ (बातमीदार) : संत कक्कया संस्था संचालित श्री गणेश विद्या मंदिर शाळेत दोन दिवस शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. १० ऑगस्‍ट रोजी शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी संपूर्ण शाळेचा सर्व कारभार पाहिला. या वेळी विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या; तर आज १२ ऑगस्‍ट रोजी संस्थेच्या वतीने शिक्षकांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनींनी स्वेच्छेने शाळेचा कारभार चालवून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामाचा अनुभव घेण्याचा मानस शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर बांदिवडेकर यांच्याकडे व्यक्त केला. त्यास मुख्याध्यापकांनी संमती दिली. एक दिवस आधी झालेल्या निर्णयानुसार विद्यार्थिनींनी आपापसात चर्चा करून प्रत्येकीने आपली जबाबदारी घेऊन ती पार पडत शिक्षकांना वेगळी भेट दिली. शिक्षकांनी या प्रयत्नाचा सन्मान म्हणून विद्यार्थिनींचा छोटेखानी सत्कार केला. संस्थेचे अध्यक्ष शिवलिंग व्हटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात संस्थेचे सचिव राजेश खंदारे, इंग्रजी माध्यमाचे चेअरमन राजकुमार गजकोश, मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर बांदिवडेकर, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका वनिता नाडार तसेच संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकगण व शिक्षेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96544 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..