कामगार वसाहतीत जाणारा मार्ग दलदलमय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगार वसाहतीत जाणारा मार्ग दलदलमय
कामगार वसाहतीत जाणारा मार्ग दलदलमय

कामगार वसाहतीत जाणारा मार्ग दलदलमय

sakal_logo
By

चेंबूर, ता. १२ (बातमीदार) ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार वसाहतीकडे जाणारा मार्ग खड्ड्यांनी व दलदलीने व्‍यापला आहे. या मार्गावरून चालताना रहिवाशांना त्रास होत आहे. याकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार वसाहतीमध्ये १८ पेक्षा अधिक इमारती आहेत. या इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार व त्यांचे कुटुंबे राहत आहेत. या रहिवाशांना चेंबूर रेल्वेस्थानक व पी. वाय. थोरात मार्ग येथे येण्याकरिता इमारतीतच्या मधून मार्ग आहे. या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. तसेच हा मार्ग दलदलमय झाला आहे. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांना दलदलीतून मार्ग काढावा लागत आहे. पालिकेची वसाहत असूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्‍याने आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जात आहे. पालिका एम पश्चिम विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हा मार्ग बनवावा, अशी मागणी
रहिवाशी करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96553 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..