अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा आज निदर्शनाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा आज निदर्शनाचा इशारा
अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा आज निदर्शनाचा इशारा

अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा आज निदर्शनाचा इशारा

sakal_logo
By

कासा, ता. १२ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात सुमारे ६,५०० अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. ४६ वर्षे होऊनही महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला नाही. लाभार्थ्यांना आरोग्य, शिक्षण व पोषण आहार देण्याचे काम अंगणवाडी कर्मचारी वर्षातील ३०० दिवस करतात. २०१८ नंतर केंद्र व महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात कोणत्याही प्रकारची वाढ केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनात आक्रोश आहे. अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी केंद्रात केलेल्या कामाचे फोटो मोबाईलवर पाठवण्याची सक्ती सुरू केली आहे. सरकारकडून मोबाईल देण्यात आले होते, ते निकृष्ट दर्जाचे असून त्याच्यावर काम करणे शक्य नाही. अंगणवाडी केंद्रात सध्या देण्यात येणारा आहार निकृष्ट दर्जाचा असून तो लाभार्थ्यांना शिजवून देण्यासारखा नसल्याकारणाने कुपोषणाची समस्या निर्माण होऊ शकते. अशा अनेक समस्या, मागण्यांसाठी उद्या (ता. १३) जिल्हा परिषद कार्यालयावर निदर्शने करण्यात येतील, असे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस ब्रुजपाल यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96557 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..