केळवे ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळवे ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न
केळवे ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न

केळवे ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न

sakal_logo
By

पालघर, ता. १२ (बातमीदार) : पालघर तालुक्यात ८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी गाव पातळीवर ग्रामस्थांच्या बैठका सुरू असून सरपंच पदासाठी थेट निवडणूक होणार आहे. या पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न काही ग्रामपंचायतींमध्ये सुरू आहे, यासाठी केळवेतील ग्रामस्थांनी यासाठी सुकाणू समिती नेमली आहे
केळवे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थ व गावातील विविध समाज संस्था व सहकारी संस्था यांच्या माध्यमातून गावच्या हिताच्या दृष्टीने सर्वपक्षीय राजकारणी, समाजकारणी मागील हेवेदावे बाजूला ठेवून सर्वानुमते ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यासाठी रविवारी केळवे कालिका मंदिराच्या आवारात बैठक पार पडली. या बैठकीला विविध पक्ष, संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक आळीमधील दोन प्रतिनिधी नेमण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये आदिवासी अनुसूचित जमाती समाजाचे उमेदवार बिनविरोध देण्याचा निर्णय आदिवासी समाजातील संघटनांनी घेतला आहे. सर्व पक्षांचे पदाधिकारी आपापल्या वरिष्ठांची निवडणूक बिनविरोध करण्यासंबंधी प्रयत्न करतील, असे या बैठकीत ठरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे केळवे ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी म्हणून गावातील वरिष्ठ लोकांनी पुढाकार घेतला आहे.

प्रतिक्रिया
केळवे हे शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक संस्था व सहकारी संस्था अशी संस्कृती असलेले गाव आहे. या गावाला मोठा इतिहास आहे. या गावाचा विकास व्हावा व आदर्श घडवून दाखवावा, असे आम्हाला वाटते. गावातील निःस्वार्थ असणारे, भ्रष्टाचाराचा आरोप नसणारे, पारदर्शक व्यवहार करणारे, लोकांशी संपर्क असणारे, लोकांशी जुळवून घेणाऱ्या सरपंचांची आवश्यकता आहे. यासाठी आम्ही चांगल्या उमेदवाराच्या संपर्कात आहोत.
- विनोद पाटील, माजी सरपंच व ज्येष्ठ नागरिक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96558 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..