रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. १२ : पुढील दोन दिवस रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग वाढणार असून विजांसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सतत बदलत असलेल्या हवामानामुळे मच्छीमारांच्या हंगामाला मात्र फटका बसणार आहे.
ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात बहुतांशी ठिकाणी पाऊस कोसळल्याने गणेशभक्तांची पुरती तारांबळ उडाली होती. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात पावसाने शब्दश: झोडपून काढल्याने परतीच्या मार्गावर असलेल्या चाकरमान्यांचाही खोळंबा झाला होता. आता १२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीच्या भागात तुरळक ठिकाणी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, त्याचबरोबर खोल समुद्रात जे मच्छीमार असतील त्यांनी जवळच्या बंदरात सुरक्षित आधार शोधावा, अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून देण्यात आल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96561 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..