विरार-अलिबाग कॉरिडॉरला विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरार-अलिबाग कॉरिडॉरला विरोध
विरार-अलिबाग कॉरिडॉरला विरोध

विरार-अलिबाग कॉरिडॉरला विरोध

sakal_logo
By

उरण, ता. १२ (वार्ताहर) ः बहुउद्देशीय विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रकल्प जर शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा असेल तर हा प्रकल्प नकोच, असा निर्धार उरणमधील शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच यासाठी कायदेशीर लढाई केली जाणार आहे.
बहुउद्देशीय विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सरकार परस्पर निर्णय घेत आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत शेतकरी अनभिज्ञ असून शासकीय अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. अशातच आता हा प्रकल्प एमएमआरडीएकडे वर्ग केल्याची नोटीस १२ ऑगस्टला सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्ध केली आहे. तसेच यावर हरकती नोंदविण्यासाठी २१ दिवसांची मुदत असताना ३१ ऑगस्ट रोजी नोटीस वृत्तपत्रांत प्रकाशित करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बैठकांमधून तोडगा काढण्यात अपयश
या प्रकल्पाला उरण परिसरातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावण्यात आले होते. तसेच प्रांताधिकारी राहुल मुंडके यांच्या उपस्थितीत दोन बैठकाही झाल्या आहेत. पण या बैठकांमध्ये प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना संभ्रमात ठेवण्यात आल्याने रोषाची भावना आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96564 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..